Important Links

महाराष्ट्र शासन. सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र राज्य.

About Us

सहकारी कायद्यात सन 1962 पासून प्रमाणित लेखा परीक्षक ही संकल्पना समाविष्ट आहे परंतु या आपल्या लेखापरीक्षक सहकाऱ्या साठी पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करणारी संघटना राज्यात कार्यरत नव्हती. लेखापरीक्षकांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी योग्य व अचूक अशी यंत्रणा कार्यरत नव्हती. त्यामुळे लेखापरीक्षकांच्या योग्य मागण्या योग्य त्या प्रकारे शासन दरबारी पोहोचत नव्हत्या. लेखापरीक्षकांचे प्रभावी राज्यव्यापी संघटन झालेले नव्हते. यातच कोविड 2019 ची सुरुवात झाली. अध्यक्ष रामदास शिर्के व सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून त्यावेळी सर्वांनी संपर्कात राहणे व आपल्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने ऑनलाइन वेबिनार घेण्यास सुरुवात केली. यातूनच आपले लेखापरीक्षक एकत्र येऊन ऑडिटर कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे या संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. राज्याच्या विविध भागातून आपल्या लेखापरीक्षण कार्याचा त्याचा उमटविणारे आणि नेतृत्व करण्यास पात्र असे सक्षम लेखापरिक्षक या संघटनेचे विश्वस्त झाले आणि दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी आपण आपल्या या राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या संघटनेची नोंदणी केली. योग्य मार्गदर्शन व गुणवत्तापूर्वक लेखापरीक्षण हेच ऑडिटर कौन्सिलचे मिशन आहे.