खजिनदार
श्री संदीप अरविंद नगरकर
नाशिक
9423698233

श्री संदीप अरविंद नगरकर ,
राहणार :- नाशिक. बी. कॉम., डी. टी. एल., जी.डी.सी.अॅण्ड ए. असून सन 2009 पासून सर्टिफाइड ऑडिटर म्हणून सहकार क्षेत्रात कार्यरत, तसेच 2017 पासून अधिकृत लेखापरीक्षक, मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या पॅनेलवर कार्यरत आहे.
🔸हौसिंग बचाव समिती नाशिक महानगर, सचिव म्हणून कार्यरत असून त्यायोगे सहकारी संस्थांचे सभासद तसेच धर्मदाय संस्थांचे विश्‍वस्त यांच्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण, मेळावे यशस्वीपणे आयोजित केलेले आहेत.
⭐ऑडिटर कौन्सिल अॅण्ड वेल्फेअर असोसिएशन या राज्यस्तरीय संस्थेच्या खजिनदारपदी कार्यरत असून लेखापरीक्षकांसाठी नाशिक जिल्ह्यात करोना कालावधी विविध प्रकारचे मदतकार्य करण्यात आले, त्यामध्ये करोनाची रॅपिड टेस्ट तसेच लेखापरीक्षक यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.
🔹ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर सचिव म्हणून कार्यरत असून ग्राहकांना येणाऱ्या अडचणींना मार्गदर्शन करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करत आहे.