सचिव

श्री. उमेश देवकर
अहमदनगर
8446471555

श्री. उमेश विश्वासराव देवकर, राजयोग, प्लॉट नं. 42, शाहूनगर, केडगाव, अहमदनगर, 414 005, एम.कॉम.जी.डी. सी.& ए., सन 2000 पासून प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून काम करत आहे. संस्थापक अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा सर्टीफाईड ऑडिटर्स असोसिएशन, अहमदनगर तसेच सध्या महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन, पुणे या राज्यस्तरीय संस्थेच्या सचिवपदी कार्यरत आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर सहकारात काम करत असलेली अतिशय नामांकित संस्था, सहकार भारती, या संस्थेच्या अहमदनगर जिल्ह्याच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थासाठीच्या प्रकोष्ट पदी काम करत आहे. तसेच आजपर्यंत सर्टीफाईड ऑडिटर्स यांना आलेल्या विविध अडचणी सोडवण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या नांवे व नंतर अहमदनगर जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत जवळ जवळ 6 ते 7 रिट पिटीशन औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल करून सर्व रिट याचिका यशस्वी चालवून सर्व निकाल सर्टीफाईड ऑडिटर्स यांच्या बाजूने मिळवले आहेत ही जमेची बाब आहे, त्यामध्ये लेखापरीक्षक यांनी ऑडिट करावयाची संस्थांची मर्यादा असेल व लेखापरीक्षक यांचा सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे ऑडिट फी असेल, की पतसंस्थाची व पगारदार संस्थांची ऑडिट फी शासनाने 70 टक्के कमी केली होती. तसेच सदैव सर्टीफाईड ऑडिटर्स यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना मार्गदर्शन करणे व वेळप्रसंगी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे ई. सर्व कामे सर्वांच्या आशीर्वादाने, सहकार्याने व पाठिंब्यामुळे आजपर्यंत करू शकलो तसेच यापुढेही कायम करतच राहील ही ग्वाही देत आहे.