उपाध्यक्ष

श्री. आबासाहेब नानासाहेब देशमुख
औरंगाबाद
9421302328

श्री. आबासाहेब नानासाहेब देशमुख, मूळ गाव कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, 1997 पासून औरंगाबाद येथे वास्तव्य,शिक्षण बी.ए. अर्थशास्त्र पुणे विद्यापीठ ,डी सी एम ,जी.डी. सी.& ए., सन 2001 पासून प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून काम करत आहे. गेली 12 वर्षे औरंगाबाद जिल्हा अधिकृत व प्रमाणीत लेखापरीक्षक असोसिएशन चा अध्यक्ष असून सदर जबादारी आजही कायम आहे,सध्या महाराष्ट्र राज्य ऑडिटर्स कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन, पुणे या राज्यस्तरीय संघटनेच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे, तसेच राष्ट्रीय स्तरावर सहकारात काम करत असलेली नामांकित संस्था, सहकार भारती मध्ये गेली 15वर्ष काम करीत आहे, सहकार भारती औरंगाबाद जिल्ह्याच्या संघटन मंत्री म्हणून दायित्व आहे,यापूर्वी मराठवाडा कार्यकारिणी सदस्य म्हणून 5 वर्षे काम केले आहे,
महत्वाचे म्हणजे राज्यातील,विशेषतः मराठवाडा विभागातील प्रमाणीत लेखापरीक्षक तसेच नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार पतसंस्था पदाधिकारी, संचालक व कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी सहकार खाते तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि पतसंस्था फेडरेशन तसेच जिल्हा सहकारी बोर्ड ,वेगवेगळ्या सहकारी संस्था यांचे मार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक/खुला व्याख्याता म्हणून गेली 16 वर्ष काम करत आहे,सरकार सुगंध, सहकार भक्ती,सकाळच्या शेती सहकार व बँकिंग विशेषांकात अनेक वेळा लेख प्रसिद्ध झाले आहेत ,सहकारात सुसंस्कृत आणि प्रामाणिक कार्यकर्ते घडवणे आणि सहकारी संस्था बळकटीकरण करून सहकारी चळवळ निकोप वाढीसाठी सतत प्रयत्न करत आहे,🙏