आपणास कळविण्यास आनंद वाटतो की सहकाराची मुहूर्तमेढ रोवलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तसेच संत महंत यांच्या पद स्पर्शाने पावन देवभूमीत ऐतिहासिक अहमदनगर जिल्ह्यात ऑडिटर्स कौन्सिल अँड वेल्फेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यावतीने मंगळवार दि. 20 व बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी श्री क्षेत्र दत्त देवस्थान, देवगड, तालुका-नेवासा, जिल्हा-अहमदनगर येथे राज्यातील प्रमाणित लेखापरीक्षक यांचेसाठी निवासी लेखापरीक्षक अधिवेशन, कार्यशाळा व प्रशिक्षण आयोजित करीत आहोत. सदर ज्ञानसत्रास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.